शुक्रवार, ११ जून, २०२१

श्यामची आई अभिवाचन (audible)

 ╭══════════════════╮

 श्यामची आई अभिवाचन (audible)

╰══════════════════╯

  सानेगुरुजी शै.विचारमंच अमळनेर

   व 

    शिक्षण विभाग, पं.स. अमळनेर

      यांचे संयुक्त विद्यमाने

कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व अनलॉक काळात प्रत्यक्ष शाळा बंद असल्यातरी बालकांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन व शिक्षकवृंद प्रयत्न करत आहेतच.

माननीय गटशिक्षणाधिकारी *श्री.आर.डी.महाजन साहेब* आणि माननीय शिक्षणविस्ताराधिकारी *श्री.पी.डी.धनगर साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील प्राथ. व माध्य. शाळांसाठी संस्कारक्षम श्यामची आई पुस्तकातील कथांचे शिक्षकांच्या उत्स्फुर्त सहभागातून अभिवाचन करुन शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व पूज्य साने गुरुजी स्मृती दिनाचे औचित्य साधून दि.11 जून पासून नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात येत आहे....

"श्यामची आई अभिवाचन (audible)"

इयत्ता 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी *"श्यामची आई"* पुस्तकातील कथांचे क्रमश: दररोज एक कथा याप्रमाणे ऑडिओ स्वरूपात आपणांस देण्यात येईल. माननीय केंद्र प्रमुख, माननीय मुख्याध्यापक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत ह्या "संस्कारक्षम श्रवणकथा" नियमित पोहोचवाव्या. तसेच शिक्षकांनी याचा वेळोवेळी आढावा घ्यावा, ही विनंती. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणात अमळनेर तालुक्यातील प्राथ. व माध्य. शिक्षक निश्चितच हा उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत नेतील याची आपण सर्वांना खात्री आहे.

🟧 कार्यक्रम शुभारंभ 🟧

दि.11 जून पासून श्यामची आई पुस्तकातील *प्रस्तावना, प्रारंभ व पुढे क्रमश: 42 रात्रींचे* दररोज एक कथा याप्रमाणे ऑडीबल भाग प्रसारित केले जातील.

सदर संस्कारक्षम अभिवाचन *व्हॉटसअपगृपच्या* माध्यमातून दररोज ऐकता येईल. सदर अभिवाचनाची पोस्ट ऑडीओ क्लिपसह अमळनेर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक शाळेने आपापल्या शाळेच्या वर्गनिहाय गृपवर पाठवावी ही विनंती.

 उपक्रम संयोजक

     दत्तात्रय सोनवणे (9420111182)

     समन्वयक, सानेगुरुजी शै.विचारमंच 

     🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा