अवांतर वाचनाची पुस्तके

 अवांतर वाचनासाठी पुस्तके

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या तर्फे लाॅकडाऊनच्या काळात अवांतर वाचनासाठी ऑनलाईन पुस्तकांचा खजिना बालगोपाळ व वाचनाची आवड असणारे पुस्तक प्रेमींसाठी परिषदेने उपलब्ध करून दिला आहे. ही पुस्तके राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संकेेेतस्थळावर उपलब्ध आहेत. या पुस्तकांद्वारे बालगोपाळांचे भावविश्व समृध्द करण्याचा प्रयत्न केला आहे.या ऑनलाईन पुस्तकांच्या नगरीत... मुनमुन आणि मुन्नू, लहानगे बदकाचे पिलू, चंदुची चाट, श्रावणातील जत्रा, चला सक॔स पाहू या!,भारी कोण, सव॔श्रेष्ट कोण, मिठाई, झोका, भूमातेचे पुत्र, बबलीचं ढोलक, सप्तरंगी चेंडू इत्यादींसह विविध विषयांवरील 82 पुस्तके ऑनलाईन अवांतर वाचनासाठी उपलब्ध झाली आहेत. सध्या क्रीडांगणे, बगीचा याठिकाणी खेळण्यास मुलांना मज्जाव असल्याने व लाॅकडाऊनच्या काळात मुलांचे भावविश्व टिव्ही, मोबाईलच्या काय॔क्रमात कोमेजू नये या दृष्टिकोनातून अवांतर वाचनाची पुस्तके मुलांसाठी उपलब्ध केल्याचे परिषदेने जाहिर केले असून सदर संकेतस्थळावरील उपलब्ध पुस्तकांचा मुलांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

अंवातर पुस्तके वाचनासाठी चित्राखालील नावावर क्लिक करा.

अंवातर वाचनाची पुस्तके



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा