बुधवार, २१ मे, २०२५

तयारी शिष्यवृत्ती- नवोदयची

╭═════════════════╮

 *📱तयारी शिष्यवृत्ती- नवोदयची📱*

 ╰═════════════════╯

  *जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे*
  *ता.अमळनेर जि.जळगाव*
  ════✦✧✧♾️♾️✧✧✦════
*⏺️ उपक्रम ⏺️*
   *🎯तयारी शिष्यवृत्ती-नवोदयची🎯*     
 *📱Online Study📱*
 विषय:- भाषा
 *घटक: - भाषा विषयक सामान्य ज्ञान*
         
*१ सुप्रसिध्द व्यक्ति: *

(१)लता मंगेशकर - गायिका

(२)डॉ.जयंत नारळीकर - शास्त्रज्ञ

(३)डॉ. अब्दुल कलाम - शास्त्रज्ञ

(४)अमिताभ बच्चन - अष्टपैलू अभिनेता

(५)अण्णा हजारे - ज्येष्ठ समाजसेवक

(६)झाकिर हुसेन - तबलावादक

(७)मिल्खा सिंग - धावपटू

(८)हृदयनाथ मंगेशकर - संगीतकार, गायक

(९)रतन टाटा - उद्योजक

(१०)मुकेश अंबानी - उद्योजक

(११)मुकुंद किर्लोस्कर - उद्योजक

(१२)सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू

(१३)सचिन पिळगावकर - अष्टपैलू कलावंत

(१४)अंजली भागवत - नेमबाजी

(१५)मेरी कोम - मुष्टीयुद्ध

(१६)पी. टी. उषा - धावपटू

(१७)अभिनव बिंद्रा - नेमबाजी

(१८)सायना नेहवाल - बॅडमिंटन

(१९)सोनू निगम - गायक

(२०)श्रेया घोषाल - गायिका

(२१)पल्लवी जोशी - निवेदिका 

(२२)अवधूत गुप्ते - संगीतकार, गायक

*२ थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा :*

(१)  “आराम हराम है।” - पंडित नेहरू

(२) “चले जाव।”- महात्मा गांधी

(३) “जय जवान! जय किसान!” - लाल बहादूर शास्त्री

(४) “मेरी झाशी नही दूँगी”- राणी लक्ष्मीबाई

(५) “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूँगा।” - सुभाषचंद्र बोस

(६) “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे!” - लोकमान्य टिळक

(७) “जय जवान! जय किसान! जय विज्ञान!” - अटलबिहारी वाजपेयी

*३  थोर समाजसुधारक :*

(१)महात्मा फुले - स्त्री शिक्षणाचा पाया

(२)लोकमान्य टिळक - भारतीय असंतोषाचे जनक

(३)महात्मा गांधी - अहिंसेचे पूजक

(४)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दलितोद्धार

(५)कर्मवीर भाऊराव पाटील - रयत शिक्षण संस्था

(६)राजर्षी शाहू महाराज - दलित वसतिगृह

(७)गोपाळ गणेश आगरकर - ‘सुधारक’ नावाचे वृत्तपत्र

(८)आचार्य विनोबा भावे - भूदान चळवळ

(९)सरदार वल्लभभाई पटेल - संस्थाने खालसा

(१०)डॉ. बाबा आमटे - कुष्ठरोग निर्मूलन /आनंदवन

*४  राष्ट्रीय :*

(१)राष्ट्रीय फूल - कमळ

(२) राष्ट्रीय प्राणी - वाघ

(३) राष्ट्रीय पक्षी - मोर

(४) राष्ट्रीय ध्वज - तिरंगा

(५)राष्ट्रगीत - जन-गण-मन

(६)राष्ट्रीय गीत - वंदे मातरम्

*५  लेखक-कवी व ग्रंथ :*

(१)महर्षी वाल्मिकी - रामायण

(२)महर्षी व्यास - महाभारत, भगवद्गीता 

(३)संत ज्ञानेश्वर - भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी )

(४)संत तुकाराम - अभंगगाथा

(५)संत एकनाथ - भावार्थरामायण, भागवत्

(६)संत रामदास - दासबोध, मनाचे श्लोक

(७)आचार्य विनोबा भावे - गिताई

(८)साने गुरुजी - श्यामची आई

(९)रवींद्रनाथ टागोर - गीतांजली

(१०)लोकमान्य टिळक - गीतारहस्य

(११)कालिदास - मेघदूत, ऋतूसंहार, रघुवेश, कुमारसंभव

(१२)वामन पंडीत - यथार्थ दीपिका

(१३)ग.दि.माडगूळकर - गीत रामायण

(१४)बंकिमचंद्र चटर्जी - आनंदमठ

(१५)मुकुंदराज - विवेक सिंधू

(१६)मोरोपंत - केकावली

(१७)वि. स. खांडेकर - ययाति


*६  लेखक-कवी व त्यांची टोपण नावे :*

(१)नारायण सूर्याजीपंत ठोसर - संत रामदास

(२) कृष्णाजी केशव दामले - केशवसुत

(३)त्र्यंबक बापुजी ठोमरे - बालकवी

(४)नारायण मुरलीधर गुप्ते - बी

(५)राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज, बाळकराम

(६)प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार

(७)विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज

(८)आत्माराम रावजी देशपांडे - अनिल

(९)श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी - पठ्ठे बापूराव

(१०)माणिक गोडघाटे - ग्रेस

(११)गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर

(१२)शंकर काशिनाथ गर्गे (नाट्यछटाकार) - दिवाकर

(१३)चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरतीप्रभू

(१४)माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन

(१५)मोरोपंत रामचंद्र पराडकर - मोरोपंत


*७  थोर व्यक्तींची संबोधने :*

(१)वल्लभभाई पटेल - सरदार , लोहपुरुष

(२)बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य

(३)जवाहरलाल नेहरू - पंडित, चाचा

(४)दादाभाई नौरोजी - पितामह

(५)जोतीबा फुले - महात्मा

(६)रवींद्रनाथ टागोर - गुरुदेव

(७) सुभाषचंद्र बोस - नेताजी

(८)मोहनदास करमचंद गांधी - महात्मा,राष्ट्रपिता

(९)डॉ.बाबासाहेब आंबेडकर - भारतीय घटनेचे शिल्पकार

(१०) विनायक दमोदर सावरकर - स्वातंत्र्यवीर

*८ नाटककार व त्यांची नाटकाची नावे :*

(१)कालिदास - शाकुंतल

(२)शूद्रक - मृच्छकटिक

(३)विशाखादत्त - मुद्राराक्षस

(४)गोविंद बल्लाळ देवल - शारदा, संशयकल्लोळ

(५)वि.वा.शिरवाडकर - नटसम्राट, ययाति आणि देवयानी

(६)राम गणेश गडकरी - प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन

(७)प्रल्हाद केशव अत्रे - मोरुची मावशी, तो मी नव्हेच, लग्नाची बेडी

(८)पु.ल.देशपांडे - तुझे आहे तुजपाशी, ती फुलराणी, बटाट्याची चाळ, असा मी असामी

(९)अण्णासाहेब किर्लोस्कर - सौभद्र

(१०)श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - मूकनायक

(११)विजय तेंडूलकर - शांतता कोर्ट चालू आहे, घाशीराम कोतवाल

(१२)कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर - द्रौपदी, स्वयंवर, मानापमान

(१३)जयंत दळवी - बॅरिस्टर, सूर्यास्त, संध्याछाया


*९ कवी व त्यांचे काव्य संग्रह :*

(१)अनिल - फुलवात, पेरते व्हा

(२)ना.धो.महानोर - रानातल्या कविता, वही

(३)विंदा करंदीकर - मृदगंध, स्वेदगंगा, जातक

(४)नारायण सुर्वे - ऐसा गा मी ब्रम्ह, जाहिरनामा, यल्गार

(५)बा.सी.मर्ढेकर - शिशिरागमन

(६)इंदिरा संत - गर्भरेशीम, मृण्मयी, मृगजळ, मेंदी

(७)बा.भ.बोरकर - जीवन संगीत, आनंदभैरवी, दूधसागर

(८)प्र.के.अत्रे - झेंडूची फुले

(९)नामदेव ढसाळ - गोलपीठा

(१०)मंगेश पाडगावकर - जिप्सी, धारानृत्य, उत्सव, विदूषक

(११)माधव ज्युलियन - स्वप्नरंजन, मधुलहरी

(१२)कुसुमाग्रज - जीवनलहरी, विशाखा, समीधा

(१३)गोविंदाग्रज - वाग्वैजयंती

(१४)सुरेश भट - रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात

(१५)शांता शेळके - वर्षा, गोंदण, तोच चंद्रमा

(१६)बी - फुलांची ओंजळ


*१० आत्मचरित्रे: *

(१)माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर

(२)कऱ्हेचे पाणी - प्र.के.अत्रे

(३)कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण

(४)श्यामची आई - साने गुरुजी

(५)स्मरणयात्रा - गो.नी.दांडेकर

(६)अग्नीपंख - ए.पी.जे.अब्दुल कलाम

(७)प्रकाशवाटा - प्रकाश आमटे

(८)एकटा जीव - दादा कोंडके

(९)सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी

(१०)स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक

(११)आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे

(१२)एक झाड दोन पक्षी - विश्राम बेडेकर

(१३)रामनगरी - राम नगरकर

(१४)उपरा - लक्ष्मण माने

(१५)बलुतं - दया पवार

✍🏻संकल्पना व संकलन
*श्री.दत्तात्रय सोनवणे (9420111182)*

शुक्रवार, १६ मे, २०२५

*🎯तयारी शिष्यवृत्ती-नवोदयची🎯*

  *स्कॉलरशिप इंग्रजी टेस्ट 1*

जि.प.उ.प्रा.शाळा पिंगळवाडे ता.अमळनेर जि.जळगाव


1) खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात 'श्' या ध्वनीने होते? (1 point)

1) sad

2) ship

3) sun

4) swan


2) खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात 'क्' या ध्वनीने होत नाही? (1 point)

1) call

2) cub

3) carrot

4) cerealy


3) खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवाती 'ट्' या ध्वनीने होत नाही? (1 point)

1) table

2) tool

3) there

4) tap


4) खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात 'च' या ध्वनीने होते? (1 point)

1) clever

2) car

3) cheek

4) curry


5) खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात 'ह' या ध्वनीने होत नाही? (1 point)

1) hand

2) hall

3) honest

4) house


6) खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात 'थ्' या ध्वनीने होत नाही? (1 point)

1) thin

2) think

3) them

4) thumb


7) खालीलपैकी कोणत्या शब्दातील ध्वनीचा उच्चार 'क' असा होतो? (1 point)

1) know

2) knot

3) kite

4) knight


8) खालीलपैकी कोणत्या शब्दात 'ई' हा ध्वनी नाही? (1 point)

1) bee

2) tree

3) see

4) sit


9) खालीलपैकी 'ओ' या ध्वनीने शेवट न होणारा शब्द कोणता? (1 point)

1) Go

2) So

3) No

4) To


10) खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात 'द' या ध्वनीने होते? (1 point)

1) train

2) they

3) throw

4) tray


            🏆Best of Luck🏆

          *-: निर्मिती व संकलन :-*

*श्री. दत्तात्रय सोनवणे* (तंत्रस्नेही शिक्षक)

सोमवार, १२ मे, २०२५

आज 10 वी चा निकाल होणार जाहीर

दहावीच्या विद्यार्थ्यींसाठी आनंदाची बातमी...

💥 इ.10 वी निकाल 2025 | 10th Result 2025

आज दि.13-05-2025 रोजी दु.1:00 वा. 10 वी चा निकाल होणार जाहीर 

   मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.


        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.০० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.


खालील लिंक वर क्लिक करुन आपला निकाल पाहू शकता.

👇👇👇👇👇

1) खालील "निकाल पहा" शब्दावर क्लिक करा.

👉निकाल पहा

2) खालील "निकाल पहा" शब्दावर क्लिक करा.

👉निकाल पहा

3) खालील "निकाल पहा" शब्दावर क्लिक करा.

👉निकाल पहा

4) खालील "निकाल पहा" शब्दावर क्लिक करा.

👉निकाल पहा

5) खालील "निकाल पहा" शब्दावर क्लिक करा.

👉निकाल पहा



सोमवार, ५ मे, २०२५

12 वी (HSC) 2025 चा निकाल

 💥 इ.12वी निकाल 2025 | 12th Result 2025

*👇 05 मे रोजी दुपारी 01:00 वाजता निकाल जाहीर केला जाणार*

*▪️निकाल पाहण्यासाठी विविध संकेतस्थळ लिंक्स...👇👇👇*


1) https://mahresult.nic.in/


2) http://www.sscresult.mkcl.org/


3) https://sscresult.mahahsscboard.in/


💁‍♀️ *निकाल कसा पहावा❓*

* सर्वात आधी दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवरती क्लिक करा. 


* तुमचा Roll Number टाका.


* त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.


* View Result या बटणावर क्लिक करा.


* तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.


* खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता.


➡️ *Share with your friends*

इरा अकॅडमी डेमो क्लास वेळापत्रक


 

गुरुवार, १८ मे, २०२३

शिक्षण विस्तार अधिकारी भरती 2023

 *शिक्षण विस्तार अधिकारी भरती 2023 करिता आवश्यक अर्हता आणि 9 मे 2023 रोजी प्रसिद्ध नवीन अभ्यासक्रमाची तयारी*

          महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 11 एप्रिल 2023 च्या पत्रानुसार सर्व विभागीय आयुक्तांना शालेय शिक्षण विभागाच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख पदे महत्वाची असून सदरची मोठ्या प्रमाणात रिक्त असणारी पदे भरण्यासाठी कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे लवकरच  शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदे लवकरच भरली जाण्याची शक्यता आहे.

        *जिल्हा परिषदेच्या 9 मे 2023 च्या पत्रानुसार जिल्हा परिषदेतील विविध पदांचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर झाला आहे. शिक्षण विस्तार अधिकारी पदाचाही  अभ्यासक्रम जाहीर झाला असून तो पूर्णतः नवीन व शिक्षणशास्त्रातील अद्ययावत संकल्पनांवर आधारित आहे.* त्यामुळे शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी आवश्यक अर्हता पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना सदर पदासाठी आतापासून तयारी केल्यास त्यांना निश्चितच यश मिळू शकते.


*शिक्षण विस्तार अधिकारी वेतनश्रेणी : 41800 - 132300*


*शैक्षणिक अर्हता व अनुभव*

          बी.एड आणि शासनमान्य 3 वर्षे अध्यापन किंवा प्रशासनाचा अनुभव

         *शिक्षण विस्तार अधिकारी सरळसेवेने अर्हता (ग्राम विकास व जलसंधारण विभाग अधिसुचना 10 जून 2014 नुसार)*

 (1) जे आधीपासून जिल्हा परिषदेच्या सेवेत नसून ज्यांचे वय ३६ वर्षापेक्षा अधिक नसेल;

          *सध्या शासननिर्णयानुसार ही वयोमर्यादा खुला प्रवर्ग 38 व राखीव प्रवर्ग 43 आहे.*

(2)ज्यानी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./बी. एस. सी. ही पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केली असेल.

 (3)ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. एड अथवा समकक्ष पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केली असेल, आणि 

(4) ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालयातील शासनमान्य पदावरील सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तिक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाच्या अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव आहे. अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाने/सरळसेवेने भरली जातील

         *एकूण रिक्त पदांच्या 50 टक्के पदे सरळसेवेने, 25 टक्के विभागीय परीक्षा व 25 टक्के पदे पदोन्नतीने भरली जातात.*


*शिक्षण विस्तार अधिकारी पदाचा नवीन अभ्यासक्रम व संदर्भ ग्रंथ:*

        *शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी तांत्रिक अभ्यासक्रम 80 गुण,मराठी 30 गुण, इंग्रजी 30 गुण, सामान्य ज्ञान 30 गुण व बुद्धिमापन 30 गुण असे विभाजनआहे. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असून 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहेत परीक्षेसाठी दोन तास वेळ असणार आहे.*


    *विस्तारअधिकारी (शिक्षण) तांत्रिक अभ्यासक्रम (40 प्रश्न 80 गुण)*

           *(केंद्रप्रमुख पेपर दुसरा व शिक्षण विस्तार अधिकारी तांत्रिक अभ्यासक्रम 80 टक्के सारखाच आहे.)*

      परीक्षेसाठी शिक्षणशास्त्र हा घटक 80 गुणांना असून या घटकाच्या अभ्यासावरच परीक्षेतील बहुतांश यश अवलंबून आहे, त्याचा नवीन अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.

     1.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व सदर अधिनियमा नुसार महाराष्ट्र राज्य नियमावली २०११ (अदयावत दुरुस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी

2.शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था / संघटन व त्यांचे कार्य

3.UNICEF, NCERT, NUEPA, NCTE CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, DIET 

4.प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य ASER, NAS, PISAT

5.प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र

6.नविन शैक्षणिक धोरण- २०२०

7.संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने 

8.समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान

9.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान

10.राष्ट्रीय शिक्षा अभियान

11.केंद्र व राज्य शासनाच्या अर्थ सहाय्य विदयार्थी वैयक्तिक लाभाच्या योजना

12.संगणक व माहिती तंत्रज्ञान- शैक्षणिक क्षेत्रातील संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि टेक्नॉलॉजी, शासनाचे कार्यक्रम मिडीया लॅब, एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र, ई-गव्हर्नर, शालेय सरल प्रणाली U-DES, DBT अल क्लासरुम, डिजीटल स्कूल, दैनंदिन माहिती देवाण घेवाण तंत्र, ई-मेल, व्हॉटस अॅप

13.महाराष्ट्र जिल्हा परिषदा, पंचायत समिती अधिनियम १९६१

14.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६६ व पंचायतराज व्यवस्थापन, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा (उक्त पुस्तकांच्या अनुषंगाने शिक्षण संबंधी तरतुदी)

15.शालेय शिक्षण विभागाची संरचना (प्रशासकीय विभाग व विविध संचालनालय) व त्यांची कार्यपध्दती.

 *संदर्भ पुस्तके*

1.केंद्रप्रमुख पेपर दुसरा व शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा - डॉ.शशिकांत अन्नदाते (तिसरी आवृत्ती)

       सदर पुस्तकात तांत्रिक अभ्यासक्रम मुद्दे व शिक्षणशास्त्र संकल्पनाची माहिती मुद्देसूद व परिक्षाभिमुख पद्धतीने दिली असल्याने हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक आहे.

2.प्रगत शैक्षणिक तंत्रज्ञान - डॉ.ह.ना.जगताप

3. शालेय प्रशासन व संघटन - डॉ.अरविंद दुनाखे

4.संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (नववी आवृत्ती)

5.महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग शासननिर्णय व योजना

6. केंद्र शासनाच्या शिक्षण विषयक योजना

7.अभ्यासक्रमातील शिक्षण विषयक संस्थांची संकेतस्थळ

8. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)


*शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेत मराठी 15 प्रश्न इंग्रजी 15 प्रश्न बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न व सामान्य ज्ञान 15 प्रश्न विचारले जाणार आहे त्याचा अभ्यासक्रम व संदर्भ पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत*

1.केंद्रप्रमुख पेपर पहिला - के' सागर

2. केंद्रप्रमुख पेपर पहिला - डॉ. शशिकांत अन्नदाते

      या दोन्ही पुस्तकातून मराठी, इंग्रजी,बुद्धिमत्ता या विषयांचे परीक्षाभिमुख तयारी करता येईल.


*मराठी (बारावी)* (15 प्रश्न 30 गुण)

सर्वसाधारण शब्दसंग्रह

वाक्यरचना

व्याकरण

म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग

उताऱ्यावरील प्रश्न

*संदर्भ पुस्तक*

के सागर/ बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे


*बौद्धिक चाचणी (पदवी)* (15 प्रश्न 30 गुण)

सामान्य बुद्धीमापन व आकलन

तर्क आधारित प्रश्न

अंकगणित आधारित प्रश्न

*संदर्भ पुस्तक*

अनिल अंकलगी/के सागर/पंढरीनाथ राणे


*इंग्रजी (बारावी)*

General Vocabulary

Sentence Structure

 Grammar

Idioms & Phrases- their meaning and use

Comprehension

*संदर्भ पुस्तक*

के सागर/ बाळासाहेब शिंदे


*सामान्य ज्ञान (पदवी)* (15 प्रश्न 30 गुण)

भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह महाराष्ट्र भारत जागतीक भूगोल - भौतिक, सामाजिक,

आर्थिक भूगोल भारत आणि महाराष्ट्र राज्य आणि शासन, - राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज,

सार्वजनिक धोरण, हक्कांचे मुद्दे आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास ध्येये,

गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम

सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान

पर्यावरणीय परिस्थीतीतील जैवविविधता हवामान बदल,सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण

 भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास

चालू घडामोडी - आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह कृषि आणि ग्रामीण विकास

     संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये

*संदर्भ पुस्तक*

1.लेटेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ

2.जनरल नॉलेज - के सागर

      अभ्यासक्रम व्यापक असल्याने या पदास पात्र शिक्षकांनी त्वरित अभ्यास सुरुवात करून आपले यश सुनिश्चित करावे तसेच आपले ओळखीच्या शिक्षक बंधू भगिनींना सदर माहिती पाठवावी.